महत्त्वाच्या बातम्या

    197

    जाहिरातींवर शिंदे सरकारचा तब्बल 42 कोटी 44 लाख रुपयांचा खर्च

    शिंदे-फडणवीस सरकारचा गेल्या ०७ महिन्यातील जाहिरातीवरील खर्च ४२ कोटी ४४ लाख रूपये

    दिवसाला १९ लाख ७४ हजार रूपये खर्च

    बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली तीव्र नाराजी

    विधान परिषद निवडणुकीच्या वेळी अपमानास्पद वागणूक देण्यात आली.कुटुंब विरोधात सार्वजनिकरीत्या विधान करण्यात आली..

    प्रकरण मिटवण्याऐवजी ते वाढवण्यात आले, कार्यकर्त्यांवर कारवाई झाली. पक्षाच्या बैठकीत देखील खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करण्यात आली..

    माझ्या विषयी मनात इतका द्वेष असेल तर नाना पटोले यांच्या बरोबर काम करणे अशक्य आहे

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी वरिष्ठांकडे पत्र दिले असले तरी आम्ही सध्या सर्वजण नाना पटोले यांच्या सोबत आहेत, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

    अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे बाळासाहेब थोरातांनी नाना पटोलेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे पत्र दिले, या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. नाना पटोलेंसोबत काम करणे आता अशक्य आहे, असे पत्रात बाळासाहेब थोरात यांनी म्हटल्याचे समोर येत आहे.

    तुर्कीमध्ये झालेल्या भीषण भूकंपात मोठी जीवितहानी

    अनेक इमारती जमिनदोस्त झाल्या आहेत. या दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून तुर्कीला आवश्यक ती सर्व प्रकारच्या मदतीची घोषणा केली.

    ‘मुंबई सागरी सेतूला लता दीदींचे नाव हवे’

    मंगेशकर कुटुंबीयांची सरकारकडे मागणी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here