
◼️ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काही दिवसांपूर्वी दिव्यांग आयुक्तांचे थेट विधानसभेतून निलंबन केले होते. आमदारांचां फोन न उचलणे, तसेच एका शिक्षण संस्थेबाबत सातत्याने तक्रारी असूनही कारवाई न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.
◼️ आता, आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचे निलंबन करण्यात आलं आहे. संगीता चव्हाण यांनी मराठा समाजातील तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिले होते, त्यामुळे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून याबाबत अधिवेशनात घोषणा देखील करण्यात आली.
दरम्यान, या निलंबनाच्या कारवाईनंतर उपायुक्त संगीता चव्हाण यांनी माध्यमांसमोर बोलण्यास नकार दिला आहे. परंतु आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आदिवासी विभागातील उपायुक्तांवर निलंबनाची कारवाई करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे.