मराठा आरक्षण सुनावणीकडे राज्याचं लक्ष

मराठा आरक्षण सुनावणीकडे राज्याचं लक्ष

मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. स्थगिती उठविण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि विनोद पाटील यांच्या विनंती याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या खंडपीठात यावर सुनावणी होणार आहे.

न्यायमूर्ती एल.एन.राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे.

यावेळी सरकारकडून वकिल मुकुल रोहतगी, अभिषेक मनु सिंगवी, कपिल सिब्बल बाजू मांडतील. तर विनोद पाटील यांच्या वतिने वकिल संदीप देशमुख बाजू मांडतील. तर राज्य सरकारकडून वकिल पी एस पटवलीया बाजू मांडणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here