मराठवाड्यात ऑक्सिजनची चिंता मिटली! ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता चार देशांपेक्षा अधिक

573

औरंगाबाद :  एरवी मागास म्हणून ओळखला जाणारा मराठवाडा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्सिजन साठवणूक आणि निर्मितीमध्ये मात्र परिपूर्ण झालाय. मराठवाड्याची ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता ही मराठवाड्यातील  लोकसंख्या असलेल्या चार देशांपेक्षा अधिक आहे.

कोरोनाची पहिली लाट आली त्यावेळी मराठवाड्यातील औरंगाबाद घाटी रुग्णालय नांदेड शासकीय रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयातच केवळ ऑक्सिजनची साठवणूक क्षमता होती. पण पुढे दुसऱ्या लाटेत मराठवाड्याला ऑक्सिजन साठी धावपळ करावी लागली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाडा ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमतेमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे.

 पहिल्या लाटेत मराठवाड्याला 80 मेट्रिक टॅन ऑक्सिजन लागला.

साठवण क्षमता खूप कमी  होती केवळ मेडिकल कॉलेज  वगळता इतर ठिकाणी साठवण क्षमता नव्हती 

दुसऱ्या लाटेत 220 मेट्रिक टॅन ऑक्सिजन लागला होता.

आता मठावड्यात ऑक्सिजनची साठवण क्षमता आहे 845 मेट्रिक टन आहे आणि सगळे प्रकल्प पूर्णत्वास गेले तर ही क्षमता होईल 1296 मेट्रिक होईल .

पहिल्याआणि दुसऱ्या  लाटेनंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी ऑक्‍सिजन निर्मिती प्लांटवर भर दिला. जालन्यातील स्टील प्लांट, वेगवेगळे साखर कारखाने यांना ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रोत्साहन दिलं.नांदेडचा शेवटचा तालुका किनवट , बीडच्या आष्टी पाटोद्यातही साठवण क्षमतेचे टंक उभा केले. मराठवाड्यात कुठल्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन प्लांट आहेत आणि त्याची निर्मिती आणि साठवण क्षमता काय यावर एक नजर टाकूया.

औरंगाबाद  – 25 प्लांट ( 21.32 मेट्रिक टन क्षमता)

बीड – 11 प्लांट (15.13 मेट्रिक टन क्षमता)

हिंगोली –  4 प्लांट (4.11 मेट्रिक टन क्षमता)

जालना – 8 प्लांट  (6.2 मेट्रिक टन क्षमता)

लातूर – 7 प्लांट (8.4 मेट्रिक टन क्षमता)

नांदेड – 15.8 प्लांट (13 मेट्रिक टन क्षमता)

उस्मानाबाद – 8 प्लांट (16 मेट्रिक टन क्षमता)

यामध्ये एल एम ओ प्लांटची संख्या आणि निर्मिती आणि साठवणूक क्षमता पकडली तर मराठवाड्यात सध्या 845 पॉईंट 41 दोन मेट्रिक टन ऑक्सिजन साठवणूक क्षमता आहे.

केवळ साठवणूक क्षमताच वाढवली नाही तर ऑक्सिजन मिळण्यासाठी देखील यंत्रणा काम करते आहे. मराठवाड्यात सध्या 70 टक्केपेक्षा अधिक ऑक्सिजन साठवला गेला आहे.  तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु मराठवाड्यातली ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता ही मराठवाड्याएवढी लोकसंख्या असलेल्या चार देशांपेक्षा अधिक आहे .

मराठवाड्यातसध्या 1 कोटी 74 लोकसंख्या आहे . मराठवाड्यात एवढी लोकसंख्या असलेल्या चार देशांच्या ऑक्सिजन निर्मिती, साठवण क्षमता आणि रुग्ण संख्या याचा विचार केला असता मराठवाडा या चार देशांपेक्षा सरस आहे. नेदरलँड काल 32, 484 पॉझिटिव्ह रुग्ण , बेल्जियममध्ये  4 हजार 694  पॉझिटिव्ह रुग्ण, चिली देशात  4 हजार 20  पॉझिटिव्ह रुग्ण,  कझाकस्थान देशात  2 हजार 87 रुग्ण  पॉझिटिव्ह एका दिवसाला होते .मराठवाड्यात कालची रुग्णसंख्या 700 होती. या देशाची ऑक्सिजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता ही मराठवाडा पेक्षा कितीतरी कमी आहे..

तिसरी लाट ही ओमायक्रॉन विषाणूची असेल असं बोललं जात आहे. या लाटेत बाधित होणार याची आकडा अधिक असला तरी ऑक्सिजन लागणाऱ्या लोकांचा आकडा कमी असेल असं सांगितलं जात आहे. मात्र ,तरीदेखील ऑक्सिजन लागणाऱ्या लोकांचा आकडा हा एक टक्का जरी असला तरी पहिल्या आणि दुसर्‍या लाटे पेक्षा अधिक लोकांना ऑक्सिजन लागेल. त्यामुळे मराठवाड्यामध्ये आता  मुबलक ऑक्सिजन उपलब्ध असेल हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here