मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा –
१. औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील १४४ निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या नव्यानं बांधणार
२. पैठण येथील संतपीठाचे अभ्यासक्रम सुरू करणार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
३. परभणी येथे २०० बेड्सचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
४. उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाचे कामही वेगाने सुरू
५. सिंथेटिक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे
६. हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी ६ कोटी निधी
७. औरंगाबाद – अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
८. औरंगाबाद- शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
९. सातारा – देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी ३८२ कोटी रुपये १०. औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ३१७.२२ कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
११. परभणी शहरात भुयारी गटार योजनेच्या कामासही गती. ३५० कोटी रुपये
१२. परभणीसाठी अतिरिक्त पाणीपुरवठा योजना जलजीवन अभियानातून. १०५ कोटी रुपये
१३. उस्मानाबाद शहराची १६८.६१ कोटी रकमेची भूमिगत गटार योजना
१४. औरंगाबाद : १६८० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
१५. हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योग – ४.५० कोटी
१६. औरंगाबाद – शिर्डी या ११२.४० किमी मार्गाची श्रेणी वाढ
१७. समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या १९४.४८ किलोमीटरच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
१८. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतिवन प्रेरणादायी होईल असे उभारणार
१९. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
२०. मराठवाड्यात येत्या वर्षात जवळपास २०० मेगावॅट सौर प्रकल्प उभारणार
२१. औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रिया वेगाने करावी असे निर्देश
२२. घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास. वाढीव २८ कोटी रुपये खर्च
२३. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकास. ८६.१९ कोटी रुपये खर्च येईल.
२४. नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास. ६६.५४ कोटी रुपये खर्च.