औरंगाबाद, दि.10 (जिमाका) -मराठवाडा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास 10 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत शहरातील खिवंसरा सिनेप्लेक्स सिनेमा येथे आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, राज्यात डेल्टा प्लस रुग्णांची वाढ होत असल्याने या महोत्सवास जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी निर्गमित केले आहेत.