मनोज जरागेंचा देवेंद्र फडणवीस वरती गंभीर आरोप

    106

    मुंबई पालिका आणि सीएसएमटी स्थानकाच्या आवारात असलेल्या मराठा आंदोलकांना जेवायला मिळू नये, पाणी मिळू नये, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कारण सध्या पालिकेत प्रशासकाचे राज्य आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा. आयुक्त साहेब, तुम्हीही सेवानिवृत्त झालात तरी आम्ही तुम्हाला सुट्टी सवानिवृत्त मिळू देणार नाही. नंतर आमच्या गावात याल तेव्हा सगळा हिशोब केला जाईल.- मनोज जरांगे पाटील

    मुंबईत जरांगे यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील तरूण वर्गही कालपासून मुंबईत आला आहे. पण त्यांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने प्रशासनावर प्रचंड टीका केली जात आहे. तशातच, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना यावर भाष्य केले. पालिका जाणीवपूर्वक मराठा आंदोलकांना त्रास देत आहे. आमचीही वेळ येईल तेव्हा आम्ही तुमचे पाणी बंद करू, असा इशारा जरांगे पाटील यांनी मुंबईचे पालिका आयुक्त यांना दिला.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here