
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला
मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या
सरकारने एका महिन्यात निर्णय घेतला नाही तर 31 व्या दिवशी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच जरांगे पाटील यांनी बोलत असताना सरकारपुढे पाच अटी ठेवल्या आहेत.
काय आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या?
- अहवाल कसाही आला तरीही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र द्यावं लागणार.
- महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत तेवढे सगळे गुन्हे मागे घेतले जावेत.
- जे अधिकारी दोषी आहेत त्यांचं निलंबन करा.
- उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि सगळं मंत्रिमंडळ तसेच छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले हे सगळे तुमच्याबरोबर आले पाहिजेत.
- या सर्व मागण्या लिखित स्वरूपात द्या.