मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती बिनविरोध निवड

    788

    मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती बिनविरोध निवड

    मुंबई : अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ऐनवेळेस भाजपातून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांची निवड झाली. समितीच्या अध्यक्ष स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. परंतु, शेवटच्या दिवशी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला.
    त्यामुळे शहरांमध्ये राज्य सरकार चालवणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येच स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक होणार होती. परंतु, शिवसेनेनं निवडणूक होण्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळे मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती बिनविरोध निवड झाली आहे.

    या निवडीनंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आणि शिवसेनेचे जल संधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी भूमिका स्पष्ट केली. ‘अहमदनगर महापालिकेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे अंतर्गत वाद मिटून आता हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. पालिकेची स्थायी समितीची निवडणूक दोन्ही पक्ष आता एकत्र लढवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्या नंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थीची भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्याची भूमिका बजावली’ असं गडाख यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यातही याबाबत चर्चा घडवून नगरमधील अंतर्गतवादाला पूर्णविराम दिला.

    तर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी या निवडीनंतर एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. सभापतीपदाच्या निवडीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्र बसून राष्ट्रवादीचा उमेदवारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याप्रमाणे आम्हाला निरोप मिळाला, असं म्हणत जगताप यांनी आभार मानले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here