मनमाड रस्त्यावर भरदुपारी घटना हुज्जत घालून 2 लाख रकमेची बॅग लांबविली.

मनमाड रस्त्यावर भरदुपारी घटना हुज्जत घालून 2 लाख रकमेची बॅग लांबविली.

मनमाड रस्त्यावर भरदुपारी घटना हुज्जत घालून 2 लाख रकमेची बॅग लांबविलीनगर, ता.7- बँकेतून काढलेली दोन लाखाची रक्कम स्कार्पिओ गाडीत बॅगेत ठेवली असता, स्कार्पिओला धडक देऊन व हुज्जत घालून सदर बॅग लांबविल्याची घटना नगर-मनमाड रस्त्यावर सावेडीत आज दुपारी एक वाजता घडली. तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.नगर-मनमाड रस्त्यावर आज दुपारी एकच्या सुमाराला ऍक्सिस बँकेतून एक जणाने पैसे काढून ते येथील कायगांवकर सराफ दुकानासमोर आले असता, त्यांनी त्यांच्या स्कार्पिओ गाडीत सदर पैशाची बॅग ठेवली. त्यावेळी मोटारसायकलवरून दोन इसम आले. त्यांनी स्कार्पिओला धडक देऊन स्कार्पिओ गाडीच्या मालकाशी हुज्जत घातली. या संधीचा फायदा घेत अन्य दोन इसम गाडीजवळ आले. त्यांनी काय झाले, अशी विचारणा केली. तसेच नजर चुकवून त्यांनी गाडीतील बॅग काढून घेऊन मनमाड रस्त्याने पोबारा केला. त्यानंतर हुज्जत घालणार्‍या त्या दोन इसमांनीही तेथून पलायन केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे, तोफखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तसेच आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना करण्यात आली आहेत. भरदिवसा चोरीचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. या घटनेत चार आरोपींचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here