मध्य महाराष्ट्रातील काही भागात 6, 7 जानेवारी रोजी पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

867

Rain in Maharashtra : सध्या बदलत्या हवामानामुळे पावसाचा अंदाज बांधणं फार अवघड झालं आहे. अलीकडे कधीही पावसाच्या धारा कोसळतात तर हिवाळ्यातही कडकडीत उन्हामुळे हैराण व्हायला होतं. सध्या हिवाळा ऋतु सुरुव असला तरी मध्येच पावसाच्या सरीही कोसळत असतात. दरम्यान हवामान विभागाने येत्या 6 आणि 7 जानेवारी रोजी मध्य महाराष्ट्रातील काही भागात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांत पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता होसाळीकर यांनी वर्तवली आहे. त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्राच्या नकाशाच्या मदतीने याबाबतची माहिती दिली आहे.

होसाळीकर यांनी आणखी एक ट्वीट करत पुढील 3 दिवसांत नॉर्थ वेस्ट आणि मध्य भारतात किमान तापमानात 3-5°C ने हळूहळू वाढ होणार असल्याचं सांगितलं आहे.  महाराष्ट्र,गुजरातमध्ये किमान तापमानात विशेष बदल नसला तरी हळूहळू तापमान वाढणार असल्याचं त्यांनी कळवलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here