
मध्य प्रदेशातील बालाघाट येथे शनिवारी दुपारी एक चार्टर्ड विमान कोसळल्याने प्रशिक्षणार्थी महिला पायलट आणि विमानाचे प्रशिक्षक ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले.
बालाघाटच्या किरणापूर टेकड्यांमधील भक्कू टोला गावात हे विमान क्रॅश झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातस्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोन मृतदेह बाहेर काढले ज्यांची ओळख एक प्रशिक्षणार्थी महिला पायलट रुकशांका आणि विमानाचे प्रशिक्षक मोहित कुमार असे होते, असे बालाघाटचे पोलीस अधीक्षक (एसपी) समीर सौरभ यांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, विमानाने शनिवारी दुपारी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरून उड्डाण केले.
बिरसी एअरस्ट्रीप कंट्रोलर कमलेश मेश्राम यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, त्यांचे शेवटचे लोकेशन बालाघाटमधील किरणापूर येथे दुपारी 3.45 च्या सुमारास सापडले.
“अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु शनिवारी बालाघाटमध्ये गारपीट होत असल्याने खराब हवामानामुळे हे घडले असावे,” ते पुढे म्हणाले.