*मधुमेह आणि हृदयरोग.* हृदयरोग व मधुमेह यांचा संबंध फार जवळचा असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ७० टक्के मधुमेहींचा मृत्यू हृदयरोगाने होत असतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा वाढत्या वयानुसार जाड जाड बनतात. त्यांच्यात चरबी साठत गेल्याने रक्तपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होतो. मांसपेशीना रक्त न मिळाल्याने हृदयाघात होतो. या रुग्णांमध्ये हृदयाघाताची शक्यता सामान्य व्यक्तीपेक्षा चार टक्के अधिक असते.
▪️मधुमेहींमध्ये रक्तदाबाचा विकार जास्त आढळतो. अधिक चरबी, लठ्ठपणा, अनियंत्रित मधुमेह, मानसिक ताण, धूम्रपान यामुळेही हृदयविकाराची शक्यता बळावते. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये हृदयविकार यातनाविरहित असतो. त्यामुळे अटीतटीचा प्रसंग येण्यापूर्वीच हृदयरोगाचं निदान व्हायला पाहिजे. यासाठी हे काही उपाय करता येतील.
_कुठलाही त्रास जाणवत नसला तरी दरवर्षी एकदा इसीजी परीक्षण करून घ्या._ _वर्षातून एकदा चरबी कोलेस्ट्रॉल तपासणी करावी_ .
_व्यायाम नियमित करावा. मानसिक तणावापासून दूर राहावे._
_धूम्रपान करू नये. मधुमेहाला नियंत्रणात ठेवावं. रक्तदाब नियंत्रित राहिल याची काळजी घ्यावी._
*मधुमेह व स्थूलता :*
● सुमारे ७० ते ८० टक्के मधुमेहींमध्ये स्थूलता आढळते. इतर मधुमेहींच्या तुलनेत लठ्ठ मधुमेहींमध्ये इन्सुलिनची मात्र जास्त असते. याला ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ म्हणतात. यात इन्सुलिन तर असते, परंतु त्याची कार्यक्षमता कमी असते. त्यामुळे ग्लुकोजचं प्रमाण अनियंत्रित होऊन मधुमेह बळावतो. लहानपणी आहारातल्या कॅलरीजचं प्रमाण त्याच्या गरजेपेक्षा जास्त झाल्यास ते हळूहळू शरीरात चरबी रूपात साठत जाते. वाढत्या वयानुसार ही अतिरिक्त आहार सेवनाची सवय दैनंदिन स्वरूपात कायम राहते.
● लठ्ठपणा मधुमेह हृदयविकार यासारख्या असाध्य व जीवघेण्या रोगांना जन्म देत असतो. त्यामुळे स्वत:ला लठ्ठपणापासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या.
● आपली उंची, वजन व दिनचर्येनुसार कॅलरीजचे प्रमाण निर्धारित करून आहार नियमांचं पालन करा.
● नियमित व्यायाम करावा, म्हणजे शरीरातील चरबी उपयोगात येऊ शकेल. व्यायामामुळे इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे मधुमेहावर नियंत्रण राहते.
● आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला मधुमेहाचा विकार जडला तर स्वत:ला त्यापासून मुक्त राखण्याची सावधानता आजच बाळगावी.
● स्थूलत्वापासून दूर राहावं. पोट मोठं होणं हेदेखील स्वास्थ्यासाठी हानीकारक ठरू शकतं.
● लठ्ठपणामुळे हायपोथायरॉएडिज्म रोगांची शक्यता बळावते हे प्रत्येक डॉक्टरनं लक्षात ठेवलं पाहिजे. मधुमेही स्त्री गर्भवती होऊ शकते. परंतु एका निरोगी बाळाला जन्म देताना तिला अनेक सावधगिरीचे उपाय योजावे लागतात.
● गर्भावस्थेत रक्तातील साखरेवर कडक नियंत्रण ठेवायला हवं. अन्यथा शिशूमध्ये अनेक विकारांची शक्यता बळावू शकते. उदा. प्रमाणाबाहेर वजन व डोकं मोठं असणं.
● ग्लुकोज, ब्लडप्रेशर तपासणी व शिशुप्रति अल्ट्रा सोनोग्राफी, डोळे, हृदय व किडनीची तपासणी करणं आवश्यक असतं.
● डायबिटीजमध्ये रक्तातील साखरेचं नियंत्रण इतर मधुमेहीच्या तुलनेत अधिक कडकपणे केलं जातं. ज्यामुळे शिशूवर मधुमेहाचा परिणाम होत नाही. आहार नियमाचं पालन करून पोट रिकामं असताना साखरेचं प्रमाण ९५ मिग्रॅ व जेवणानंतर १२० मिग्रॅ ठेवण्याचा प्रयत्न करावा.__________________________