मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत
पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव, (जिमाका) दि. 6- भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील प्राप्त निर्देशान्वये, दि. 1 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत झाला आहे. याचा पात्र मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, 18- पाचोरा विधानसभा मतदार संघ श्री. राजेंद्र कचरे यांनी केले आहे.
18- पाचोरा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार यादी निरीक्षक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार नाव नोंदणी, मतदार यादी शुध्दाकरणाचे कामकाज नियमित सुरु आहे. यामध्ये 3 लाख 10 हजार 336 इतक्या मतदारांचे 100% रंगीत छायाचित्र जमा करुन अपलोड करण्यात आलेले आहेत. प्रत्येक पात्र मतदाराने/पात्र व्यक्तीने आपल्या गावातील/यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेशी संपर्क साधून नावनोंदणी तसेच छायाचित्र/नावात अथवा राहत्या पत्त्यात सुधारणा याबाबत विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन तो परीपुर्ण भरुन सादर करावा.
नावनोंदणी/नावात बदल/पत्त्यात अथवा तपशिलात बदल या बाबींना कोणतेही शुल्क लागत नाही. सध्याच्या कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून नागरीकांना घरी बसुनही www.nvsp.in तसेच voter helpline App या प्रणालीवर देखील नाव नोंदणी करता येईल. त्याचबरोबर नव मतदार नाव नोंदणी, नाव वगळणे, नाव/छायाचित्र आदी तपशिलात बदल, एकाच मतदार संघातील रहिवासात बदल याकरीता फॉर्म भरुन बदल करुन घ्यावे. असेही उपविभागीय अधिकारी श्री. कचरे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000
Home महाराष्ट्र जळगाव मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम घोषीत पात्र मतदारांनी लाभ घेण्याचे आवाहन