मणिपूर : मणिपूर व अंतरवली घडवल्या जात आहेत : महिला कानडे

    116

    श्रीरामपूर: केंद्र व राज्य सरकार (Central and State Govt) विकासाच्या सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यांचे ढोंग व पितळ उघडे पडायला लागले आहे. त्यामुळे मणिपूर(Manipur), अंतरवली, सराटी सारख्या घटना घडवून आणल्या जात आहेत. जनतेची दिशाभूल (Misleading the public) करून मुळ प्रश्नाला बगल देण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेने याचा विचार करून अशा गोष्टीना थारा देऊ नये, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी जनसंवाद यात्रेदरम्यान आयोजित बैठकीत केले.

    आमदार कानडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस (Congress) पक्षाच्या जनसंवाद यात्रेस राहुरी तालुक्यातील तिळापूर व वांजुळपोई या गावातून प्रारंभ झाला. यावेळी जनतेशी संवाद करण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रखमाजी जाधव, नानासाहेब रेवाळे, सरपंच बापूसाहेब आघाव, सरपंच डॉ. साळुंके, एकनाथ पवार, डॉ. सचिन पवार उपस्थित होते.

    आमदार कानडे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकरी कायदा आणला. त्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर हा कायदा रद्द करण्यात आला. आता अदानीला विमानतळ, बंदरे, रेल्वे विकण्यात येत आहे. एकाच व्यक्तीला हे विकण्याची गरज काय आहे. म्हणजेच यात काही तरी काळे बेरे असण्याची शक्यता आहे. स्व. पंतप्रधान राजीव गांधी यांनी संगणक युग आणले. त्यानंतर माध्यमांची क्रांती झाली. काँग्रेसच्या काळात 40 हजार कोटीचे देशावर कर्ज होते आता ते 158 लाख कोटींवर गेल्याचे ते म्हणाले.

    यात्रेदरम्यान आमदार कानडे यांनी गावातील नागरिकाचे प्रश्न जणून घेतले. आमदार कानडे यांनी दलित वस्तीत जाऊन महिलांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी रेशनकार्ड, घरकुल, डोल, जातीचे दाखले या सुविधा मिळत नसल्याचे सांगितले. याबाबत गावात ग्रामसभा घेऊन तसेच सर्व्हे करून प्रश्न सोडविण्याच्या सूचना ग्रामसेवकास दिल्या. यावेळी सुनीता गायकवाड, मंदा खरात, आशा अवसरमल, सरस्वती जाधव, बापू कोळेकर, संजय भाकरे, प्रकाश वाघमारे यांनी प्रश्न मांडले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here