मंदीरात चोरी करणारा वाकोडी येथील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद.

    126

    क्रमांक पीआरओ/प्रेसनोट/166/2023 प्रेस नोट दिनांक :- 03/08/2023

    मंदीरात चोरी करणारा वाकोडी येथील आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरकडुन जेरबंद.
    ————————————————————————————¯ÖÏßÖãŸÖ बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. विक्रम नामदेव कदम वय 32, धंदा व्यवस्थापक गोरक्षनाथ गड, मांजुरसुंबा, ता. नगर यांनी दिनांक 27/07/2023 रोजी रात्री अनोळखी इसमाने गोरक्षनाथ गड मंदीरातील तीन दानपेट्या फोडुन रोख रक्कम चोरी करुन नेली होती. सदर घटने बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 678/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
    सदरची घटना संवेदनशिल असल्याने मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथक नेमुन गोरक्षनाथ गडावरील मंदीर चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
    नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसईतुषार धाकराव, पोहकॉ/दत्तात्रय हिंगडे, देवेंद्र शेलार पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, फुरकान शेख, पोकॉ/रोहित मिसाळ, शिवाजी ढाकणे, अमृत आढाव, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, बापुसाहेब फोलाणे, चापोहेकॉ/उमाकांत गावडे व चापोकॉ/अरुण मोरे यांचे विशेष पथक नेमुन मंदीर चोरीचा गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास रवाना केले.
    स्थागुशा पथकाने घटना ठिकाणास भेट देवुन फिर्यादी व साक्षीदार यांचेकडे विचारपुस करुन रेकॉर्ड वरील आरोपींचा शोध घेताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे महेश पवार रा. वाकोडी, ता. नगर याने त्यांचे इतर साथीदारासह गोरक्षनाथ गडावरील मंदीरात दानपेटी फोडुन चोरी केलेली आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले. पथकाने लागलीच वाकोडी, ता. नगर येथे जावुन संशयीत नामे महेश पवार याचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) महेश सुर्यभान पवार वय 25, रा. पदमपुरवाडी, वाकोडी, ता. नगर असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार नामे 2) संजय गुलाब पवार (फरार), 3) अनिकेत सोपान पवार (फरार) दोन्ही रा. पदमपुरवाडी, वाकोडी, ता. नगर व 4) सोनु लहु बर्डे रा. शिराढोण, ता. नगर (फरार) अशांनी मिळुन केल्याची कबुली दिली.
    ताब्यातील आरोपी नामे महेश सुर्यभान पवार यास त्याने आणखीन कोठे कोठे व किती गुन्हे केले या बाबत विचारपुस करता त्याने एप्रिल 2023 मध्ये साथीदार नामे 5) किरण विलास पवार (फरार) याचे सोबत वाघुंडे खुर्द, ता. पारनेर येथील दत्त मंदीरात चोरी केल्याची कबुली दिल्याने गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एक गुन्हा उघडकीस आला आहे.
    अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

    1. सुपा गु.र.नं. 113/23 भादविक 457, 380 आरोपी नामे महेश सुर्यभान पवार यास 10,000/- रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट व 10,000/- रुपये रोख असा एकुण 20,000/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपीचे फरार साथीदारांचा शोध घेतला परंतु ते मिळुन आले नाहीत.

    आरोपी नामे महेश सुर्यभान पावार हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द घरफोडी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे –

    अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

    1. पारनेर गु.र.नं. 437/22 भादविक 379, 34
    2. पारनेर गु.र.नं. 647/22 भादविक 380, 34
    3. सुपा गु.र.नं. 113/23 भादविक 457, 380
    4. पारनेर गु.र.नं. 350/23 भादविक 379, 34 (फरार)
    5. एमआयडीसी गु.र.नं. 678/23 भादविक 379

    सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

    पोलीस अधीक्षक, अहमदनगर
    यांचे करीता

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here