मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्चसंदर्भात राज्य सरकार घेणार टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार
मुंबई : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार प्रत्येक नागरिकाचा विचार करून निर्णय घेत आहे. प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्याने सुरू होत असून मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च उघडावे, अशी मागणी होत आहे. परंतु कोरोनाची बाधा होऊ नये, त्यासाठी राज्य सरकार सावधपणे आणि टप्प्याटप्प्याने निर्णय घेणार आहे, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मांडली.
ते म्हणाले, महाराष्ट्रात कृषी विधेयक मंजूर करणार नाही. मात्र त्यापूर्वी तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. एका बाजूला कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. तर दुसर्या बाजूला बरे होऊन रुग्ण घरी जाण्याची संख्यादेखील अधिक आहे.
त्यामुळे नागरिकांनी शासनाकडून येणार्या नियमांची आजवर पालन प्रत्येक सण उत्सवादरम्यान केले आहे. तसेच नवरात्र आणि दसरा या सणातदेखील सूचनांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. पुणे शहरात कोरोना रुग्णांचा दुप्पट होण्याचा कालावधी सद्यस्थितीला ६० दिवसांवर गेला आहे. मात्र पुण्यात गणेशोत्सवानंतर कोरोना वाढला आहे, अशी कबुली उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.