मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए राहुल राजळे यांच्यावर गोळीबार..!

राज्याचे जलसंधारण मंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार

हल्लेखोरांनी झाडल्या ५ गोळ्या :

पोलिसांकडून तपासाला वेगमंत्री गडाख यांच्या पीएवर गोळीबार

नेवासा राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांचे पीए (PA) राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर काही अज्ञात गुंडांनी लोहगाव (Lohgoan) येथे जीवघेणा हल्ला केला. यावेळी ३ ते ४ अज्ञातांनी गोळीबार केला.

राजळे एका यात्रेतून आपल्या घरी परतत असताना आधीच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी डाव साधला. त्यांच्यावर ५ फायर झाले, त्यापैकी २ गोळ्या त्यांना लागल्या.घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

राहुल राहुल राजळे यांना तातडीने उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले.

रात्री १२ च्या सुमारास त्यांच्यावर तातडीने शत्रक्रिया करण्यात आली. दरम्यान मंत्र्यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

राहुल राजळे यांचा काही वर्षांपासून गडाख परिवारासोबत आहेत. सध्या ते मंत्री शंकरराव गडाख यांचे पीए म्हणून काम पाहत आहेत.

सदर घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तर पीए राहुल राजळे यांना उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले.

हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here