मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगर मधून घेतले ताब्यात

    302

    राज्याचे मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होता. धमकीचा फोन अहमदनगर मधून केला गेला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झालेले. याप्रकरणी अहमदनगरच्या पोलिसांनी शेवगाव मधून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. बाळकृष्ण भाऊसाहेब ढाकणे (34) असे त्या व्यक्तीचे नाव आहे

    मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन अहमदनगरच्या शेवगाव मधून आल्याचे समोर आल्यानंतर नगर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. ”आम्ही त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले आहे. सदर व्यक्ती ही स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करीत आहे. ही परीक्षा सुरळीत रित्या व स्वच्छ पारदर्शक व्हावी या उद्देशाने त्याने मंत्रालयामध्ये फोन केला असल्याचे सांगितलेले आहे. त्यावेळी त्याने मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र फोनवरील व्यक्तीने मुख्यमंत्र्यांशी बोलणे करून दिले नाही. त्यामुळे रागाच्या भरात त्याने मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली”, असे नगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here