भीषण अपघात 5 जण जागीच ठार तर 5 जण गंभीर जखमी मृतांमध्ये नवरीचाही समावेश असून नवरदेव गंभीर जखमी आहे. 

656
  • नांदेड : भोकर ते किनवट रस्त्यावरील सोमठाणा पाटीजवळ मांडव परतणीसाठी चाललेल्या एका प्रवासी अॅपे ऑटो चा आणि ट्रक चा सोमवारी सायंकाळी भीषण अपघात होऊन यात 5 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नवरीचाही समावेश असून नवरदेव गंभीर जखमी आहे. सदर अपघातग्रस्त अॅपे ऑटो धर्माबादहून यवतमाळमधील साखरा येथे चालली होती. यावेळी सोमठाणा शिवारात समोरुन येणाऱ्या विटा वाहतूक ट्रकने ऑटो धडक दिली.
  • पूजा ज्ञानेश्वर पामलवार (21 नवरी), दत्ता ज्ञानेश्वर पामलवार (22 नवरीचा भाऊ), माधव पुरबाजी सोपेवाड ( 30 ), सुनिल दिंगाबर धोटे (28) आणि अज्ञात इसमाचा मृतांमध्ये समावेश आहे. तर नागेश साहेबराव कन्नेवार (28 नवरदेव), अविनाश संतोष वंकलवाड, अभिनंदन मधुकर कसबे (16), सुनिता अविनाश तोपलवार (35) अशी जखमींची नावे असून जखमींमध्ये एका अनोळखी इसमाचाही समावेश आहे. सर्व जखमींना नांदेडमधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here