भिवंडीत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशींना अटक

624

भिवंडी  : भारतात छुप्या मार्गाने येऊन भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. भिवंडीत अनधिकृतपणे वास्तव्यास राहून अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती. त्यांनतर  भिवंडी गुन्हे शाखेने टेक्सटाईल छापा टाकला असता हे नऊ बांग्लादेशी नागरिक कामगार म्हणून आढळून आले आहे.  या नऊ जणांकडून बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पासबूक जप्त करण्यात आले. 

भारतात छुप्या मार्गाने येऊन भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या नऊ बांगलादेशी नागरिकांना एका टेक्सस्टाईल कंपनीवर छापा मारून  पोलिसांनी अटक केली आहे. सलीम अमीन शेख( 30), रासल अबुल हसन शेख (27), मो.शाहीन मोहम्मद अकबर अली शेख (24), मोहम्मद मासुम शोयदुल्ला इस्लाम(21), तरुणमणीराम त्रिपुरा (21), सुमनमनीराम त्रिपुरा (21), इस्माईल अबुताहेर खान (19), आजम युसूफ  खान (19), मोहम्मद आमीर अबुसुफियान (26) अशी गजाआड  करण्यात  आलेल्या  बांगलादेशी  नागरिकांची  नावे आहेत. 

भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की,  बांगलादेशी नऊ नागरिकांनी  भारताचा अधिकृत पारपत्र किंवा बांगलादेशाचा विझा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून हावडा रेल्वे स्टेशन येथे आले. रेल्वेने प्रथम कल्याण व नंतर भिवंडीतील सरवली येथे येऊन अनधिकृतपणे वास्तव्यास राहून अवनी टेक्सटाईल्समध्ये काम करत असल्याची खबर दिली. त्यांनतर  भिवंडी गुन्हे शाखेने टेक्सटाईल छापा टाकला असता हे नऊ बांग्लादेशी नागरिक कामगार म्हणून आढळून आले आहे.   या दरम्यान या नऊ जणांनी बनावट पॅनकार्ड व आधारकार्ड तसेच पोस्ट ऑफिसचे पासबुक मिळवून ते शासनास खरे असल्याचे भासवून सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले आहे. 

या नऊ बांगलादेशींना कोनगाव पोलिसांच्या ताब्यात देऊन  शुक्रवारी दुपारी अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नि एन.बी.गिरासे करत आहेत. बांगलादेशी नागरिकाच्या अटकेने भिवंडीत मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here