भिंगार येथे डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक वेळी दोन गटात झालेल्या भांडणानंतर दोन्ही गटांनी परस्परविरुद्धी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्याने दोन्ही टोळ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकास लाकडी दांडक्याने गुरुवारी (दि.१४) मारहाण केल्याने जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ७ ते ८ जणांविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हुसेन रहीमान खान (रा.मोमीनगल्ली ता.जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून गु.र.न.१५५/२०२२ भादविक ३२४,१४३,१४७,१४८,१४९ कलमान्वेय सुनिल सोनवणे, शिवा भागानगरे, अशिष क्षेत्र, आकाश क्षेत्र अशी गुन्हा दाखल झाल्याची नावे असून याच्यासह ४ से ५ अनओळखी (सर्व रा. भिंगार ता.नगर जि अहमदनगर) आदिंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच सुनिल भानुदास सोनवने (रा.गवळीवाडा,भिंगार) याच्या फिर्यादीवरूनही भिंगार कम्प पो.स्टे. गुरन 156/2022 भादवि कलम 143,147, 149, 323, 504, 506, सह अ.जा.ज.का.क.3(1) (r) (s) 3 (2) (va ) प्रमाणे शादाब (पूर्ण नाव माहीत नाही रा.आलमगीर), मुक्कार नसीर शेख, फैसल हुसेन शेख, तौसिफ शेख (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. मोमीनगल्ली भिंगार), अरबाज कुरेशी ( रा.सदरबाजार भिंगार), खाज (मुन्ना भंगारवाला यांचा मुलगा), निसार कसाई राह (रा. कंजारवाडा भिंगार) याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई बेडकोळी हे तपास करीत आहेत.




