भ्रष्टाचार मध्ये सामील असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार – मतीन सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर छावणी परिषदेच्या हद्दीत असलेले प्रवेश पथकर नाके एक वर्षासाठी चालवण्यास घेतलेल्या ठेकेदाराने अवघ्या ४ महिन्यानंतर हे काम बंद केले १ लाख २८ हजार रुपयांच्या या ठेक्याच्या कामासाठी एन.एच. इंजीनियरिंग ठेकेदार संस्थेने ४ कोटी रुपयांची बोगस गॅरंटी दिली मात्र या ठेकेदाराची ८० लाख रुपये अनामत रक्कम अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील एका जबाबदार अधिकार्याने या ठेकेदाराला तात्काळ परत दिली या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद, शामराव वाघस्कर, पै.नईम शेख शिष्टमंडळ यांनी पुण्यातील कार्यालयाकडे प्रिन्सिपल डायरेक्टर यांच्याकडे पाठपुरावा केला व या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुण्याच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे छावणी परिषदेचा हा मोठा भ्रष्टाचार बाहेर काढल्या संदर्भात सर्वपक्षीय भिंगारकराणच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला यावेळी भारत पवार, संजय छजलानी,नूर शेख, प्रकाश घोरपडे, प्रदीप वाघमारे, आसिफ शेख, शिवम भंडारी, मतीन ठाकरे, दीपक लिपाने, शानू शेख, अतीक शेख, सचिन रोकडे, भारत ठोकळ, सागर कांबळे, आकाश बडेकर, शुभम शेरकर, अशोक कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाने या मुजोर ठेकेदार याला काळया यादीत टाकले विशेष म्हणजे या ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील अधिकार्याची व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात येऊन कठोर कारवाई करण्याचे आदेशही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या विद्याधर पवार यांना दिले. शिष्टमंडळाने पुण्यातील पिढी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली होती स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या ठेकेदार संस्थेला केंद्र सरकारच्या नियमानुसार कायम करावे लागते कायमची वर्क ऑर्डर घेण्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने प्रथम कामाच्या तुलनेमध्ये कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात अनामत रक्कम जमा करावी लागते व नंतर बँक गॅरंटी द्यायची असते मात्र अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील अधिकार्यांनी 19 नोव्हेंबरला वर्क ऑर्डर दिली त्यानंतर जानेवारी महिन्यात अनामत रक्कम जमा करून घेतली आणि दोन महिन्यांनी बँक गॅरंटी घेतली या गंभीर प्रकरणासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पुण्यातील पिढी कार्यालयाकडे वारंवार पत्रव्यवहार केला दरम्यान या ठेकेदारांकडून बँक गॅरंटी उशीर का झाला व घेतली अनामत रक्कम देण्यापूर्वीच त्याला वर्क ऑर्डर का दिली आणि संबंधित ठेकेदाराला त्याने जमा केलेली ८० लाख रुपये अनामत रक्कम परत देण्याची संबंधित अधिकाऱ्याने घाई का केली हे आणि दुसरा ठेकेदार नेमण्यात येण्यापूर्वीच या ठेकेदाराकडून प्रवेश पथकर संकलित करण्याचे काम काढून घेण्याची घाई का करण्यात आली असे अनेक मुद्दे या संदर्भात उपस्थित झाले आहे वास्तविक पाहता प्रवेश कर वसुलीचा हा ठेका १ कोटी २८ लाख रुपयाचा असताना अहमदनगर कॅन्टोन्मेंट ७ महिन्यात अत्यल्प उत्पन्न कमावले या कामासाठी जे कर्मचारी या कार्यालयाने तैनात केले होते त्यांचा पगारावर मिळकतीतून संबंधित कर्मचाऱ्यांच्या ३ पट रक्कम उधळली याशिवाय या कामासाठी स्वच्छता विभागाचे कर्मचारी वापरण्यात आल्याने भिंगार शहराच्या स्वच्छतेचा या ७ महिन्यात बोजवारा उडाला एका अर्थाने अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या चुकीच्या निर्णयाने भिंगार करांचे आर्थिक नुकसान तर झाले.
ताजी बातमी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
अहिल्यानगर महापालिका निवडणूक
दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...
चर्चेत असलेला विषय
अखिलेश यादव ममता बॅनर्जींना भेटणार आहेत कारण विरोधक 8 पक्षांना एकत्र आणणार आहेत
ज्या आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्रीय एजन्सींचा उघड गैरवापर म्हणून पाहिले त्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5...
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर
नगर : महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेत आज मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने ४५४ खासदारांनी...
दिल्लीः एमसीडी शाळेतील २८ मुले वर्गात ‘दुर्गंधी’ आल्याने आजारी पडली
शुक्रवारी पश्चिम दिल्लीतील एका शाळेतील किमान 28 विद्यार्थी आजारी पडले होते, कारण जवळपासच्या रेल्वे ट्रॅकमधून गॅस गळती...
ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूला Dominos कडून लाईफटाईन फ्री पिझ्झाची घोषणा
ऑलिम्पिक मेडलिस्ट मीराबाई चानूला Dominos कडून लाईफटाईन फ्री पिझ्झाची घोषणा




