भिंगार येथील सर्वपक्षाच्या वतीने पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांची छावणी परिषदेच्या घोटाळया संदर्भात भेट.
छावणी परिषदेच्या पथकर नाका घेणारया एन.एच.इंजीनियरिंग कंपनी व ठेकेदाराने बँक गॅरंटी 4 करोड 50 लाख रुपयाचे बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप – मतीन सय्यद. प्रिन्सिपल डायरेक्टर संजू कुमार हे छावणी परिषदेच्या नाक्या संदर्भात चौकशी करून 48 तासात दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन.
अहमदनगर (प्रतिनिधी)- छावणी परिषदेच्या व्हींकल इंट्री टॅक्स पथकर नाका 2020- 21 घेताना कागदपत्रांमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करून केंद्र सरकारचे आर्थिक नुकसान केल्याच्या निषेधार्थ भिंगार येथील सर्वपक्षाच्या वतीने पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार यांची भेट घेऊन या प्रकरण संदर्भात सर्व माहिती देऊन निवेदन देताना राष्ट्रवादीचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद समवेत भारतीय जनता पार्टीचे प्रकाश लूनिया, काँग्रेसचे श्याम वागस्कर, शिवसेनेचे प्रतीक भंडारी, अँड. अक्षय भांड, आरपीआयचे अमित काळे, सामाजिक कार्यकर्ते नईम शेख आदी उपस्थित होते.
छावणी परिषद पथकर नाक्याचे ठेकेदार एन.एच.इंजीनियरिंग साठी व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एम.आर.मधुर भाग्याट यांच्याशी संपर्क साधला तेव्हा माझ्या लक्षात आले की ठेकेदाराने कॅन्टोन्मेंट बोर्डाची मोठी फसवणूक केलेली आहे त्यामध्ये. ठेकेदाराने पथकर नाका घेताना बँक गॅरंटी बँक सोळवेन्सी 4 करोड 50 लाख रुपयांची देण्यात आली आहे
यामध्ये बँक गॅरंटी हे बनावट असल्याचे सय्यद यांच्या निदर्शनास आले व कंत्राटी बेसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निधीची पेमेंट स्लीप देण्यात आली तसेच सप्टेंबर 2020 मध्ये निविदा ऑनलाईन उघडण्यात आली व नोव्हेंबर महिन्यात एन.एच.इंजीनियरिंगला ठेका दिला यामध्ये दोन महिन्याची तफावत का केली ई निविदा मध्ये टेंडर भेटल्यावर पंधरा दिवसात घेतले नाही तर ते री टेंडर करण्याचे आदेश असून देखील दोन महिन्याची मुदतवाढ ठेकेदाराला देण्यात आली यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे तसेच एन.एच. इंजीनियरिंग कडून व्ही.ई.टी.ची जबाबदारी घेताना तुमच्या कार्यालयाने ठेकेदारांकडून थकबाकी चे प्रमाणपत्र घेतले होते
तसेच प्रिन्सिपल डायरेक्टर संजीव कुमार हे म्हणाले की संबंधित प्रकरणावर चौकशी करून 48 तासात दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हणाले