अहमदनगर प्रतिनिधी:- भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरातील शनिवारी मध्यरात्री नेहरू मार्केटला भीषण लागलेल्या आगीत २४ पैकी २० दुकाने आगीत जळून गेली. या आगीत छोट्या व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि देशमुख हे तातडीने हजर होऊन फायर ब्रिगेडशी संपर्क साधून तातडीने अग्निशमन गाड्या बोलावून घेतल्या.
तसेच एमसीबीचे कर्मचारी यांनाही घटने ची माहिती दिली. यामुळे नेहरूं मार्केटची आग नियंत्रणाचा प्रयत्न करण्यात आला. परंतु येथील २४ दुकानापैकी २० दुकाने आगीत जळून खाक झाली. दरम्यान घटनेची माहिती मिळाताच, जास्तीत जास्त अग्निशमन दलाशी संपर्क साधून तातडीने अग्निशमन गाड्या घटनास्थळी बोलावण्याचा प्रयत्न केला. पण मार्केटला ही भिषण आग लागल्याने यात फक्त चारच दुकान
वाचविण्यात आल्याचे दिसून आले. ही आग शाॅर्टस्र लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.