भिंगार कॅन्टोन्मेंट हद्दीतील ख्रिश्चन कब्रस्तान रोडवर घाणीचे साम्राज्य
कॅन्टोन्मेंट प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता!
बुऱ्हानगर रोड वरील ख्रिश्चन कब्रस्तान मध्ये जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर मृत प्राण्याचे अवशेष, रस्त्यावर अस्तव्यस्त पसरले आहे. कब्रस्तान मध्ये येणाऱ्यांना येथे वाहन चालवणे खूप अवघड होऊन बसले आहे. या रस्त्यावरून पायी जाणाऱ्यांना येथील दुर्गंधीचा खूप त्रास होत आहे.
कब्रस्तान मध्ये अंतविधी व आपल्या पूर्वजांना मेणबत्ती लावून अभिवादन करण्यासाठी सतत नागरिकांची ये-जा चालू असते.
तरी या रस्त्यावरील कचरा स्वच्छ करून परिसर स्वच्छ करण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे…!