भा.द.वि.क ३०२ मधील आरोपी ला अटक:

केडगाव अरणगाव बायपास रस्त्यावरील ड्रायव्हरचा खुनातील आरोपी गजाआड करण्यास नगर तालुका पोलिसांना यश

नगर प्रतिनिधी

नगर तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत (दि.२५) वार बुधवार सकाळी नऊच्या दरम्यान केडगाव अरणगाव बायपास रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळ एक अज्ञात ईसमाचे मृतदेह आढळून आला होता.या मयताचे शवविच्छेदन केले असता.त्यास अज्ञात इसमासने टणक हत्याराने पाठीत मारल्यानेच्या कारणाने फुफ्फुसांत सुज असल्याकारणाने सदर इसम मयत झाल्याचे शवविच्छेदन अहवाला वरून स्पष्ट झाले होते.नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४७५/२०२१ भा.द.वि.क ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास नगर तालुका पोलिस युद्ध पातळीवर करत असतानाच पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अपर पोलीस सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील नगर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुक्यातील पोलिस स्टेशन चे राजेंद्र सानप साह्यक पोलिस निरीक्षक नगर यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

    सदर मयताची ओळख पटवण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच नजिकच्या जिल्हात या इसमाचा संदेश देण्यात आला होता.तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया च्या साह्याने सदर मयत व्यक्तीची ओळख पटवण्यात नगर तालुका पोलिस यश आले.

या मयत व्यक्तीचे नाव विकास महादेव कदम वय ४० वर्ष , सध्या रहाणार, वैष्णवी नगर केडगाव, अहमदनगर असे आढळून आले, गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा खुण करणारा आरोपी हा (मयत) सोबतच ड्रायव्हिंग काम करणारा मिनिनाथ मच्छिंद्र अडसरे मुळ राहणार कायनेटिक चौक, अहमदनगर सध्या रहाणार अरणगाव हा असलेल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेऊन ‌अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीस न्यायालयाने तिनं दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत साठी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप साह्यक फौजदार पठाण, पोलिस हेडकॉन्स्टेबल रमेश गांगडेॅ , रावसाहेब खेडेकर, पोलिस नाईक भानुदास सोनवणे, धर्मराज दहिफळे,रवि सोनटक्के, पोलिस काॅनस्टेबल ज्ञानेश्वर खिळे,प्रशांत राठोड, जयदत्त बांगर, घोरपडे, या पथकाने हि उत्कृष्ट कामगिरीबद्दल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here