भावानेच केला बहिणीवर अत्याचार; भाऊ – बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना

1188

भावानेच केला बहिणीवर अत्याचार; भाऊ – बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना

औरंगाबाद मधील घटना देशात व राज्यात महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व बलात्कार करण्याच्या घटना वरचेवर वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर येऊन बसला आहे. महिलांच्यावर होणाऱ्या बलात्काराच्या घटना नियमितपणे घडत असताना, प्रशासन मात्र त्याकडे डोळेझाक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. औरंगाबाद येथे तर एका सख्या भावानेच आपल्या १५ वर्षाच्या एका अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करून, माणुसकीच्या नात्याला कलंक फासला असल्याची घटना समोर आली आहे.
यासंदर्भात सदर अल्पवयीन पीडित मुलीने आपल्या भावाच्या विरोधात पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी या नराधम भावाला बेड्या ठोकलेल्या आहेत. औरंगाबाद शहरातील नुर कॉलनी मध्ये सदरची संतापजनक घटना घडलेली आहे. या कॉलनी मधील एका १५ वर्षे वयाच्या अल्पवयीन सख्ख्या बहिणीवर तिच्या ३३ वर्षीय मोठ्या भावाने बलात्कार केला असल्याची घटना घडली आहे. बलात्कार केल्यानंतर काही दिवसांनी सदर अल्पवयीन तरुणीच्या पोटात त्रास होऊ लागला होता.

त्यामुळे तिला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यावेळी सदर अल्पवयीन मुलगी प्रेग्नेंट असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यावर, तेथे तिचा गर्भपात करण्यात आला असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर सदर पीडित अल्पवयीन बहिणीने आपल्या नराधम भावाच्या विरोधात सिटी चौक पोलीसाच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी नराधम भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करून, त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद शहर व जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास सिटी चौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, अशोक गिरी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here