भावपूर्ण श्रध्दांजली*??भावपूर्ण श्रध्दांजली??* आमच्या अहमदनगर बार असोसिएशनचे एक विद्यमान ज्येष्ठ सदस्य *अँड. किसनराव काशीद साहेब Retd.Colonel.Gorakha Regiment *यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली. कर्नल काशीद साहेब भारतीय लष्कर सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी परत सुमारे २४ वर्ष नगर जिल्हा न्यायालयात वकिली केली. कर्नल साहेबांचे घराणे सारोळा तालुका जामखेड येथील एक अति उच्च शिक्षित. कर्नल साहेबांचे मोठे भाऊ , १९७० साली नव्याने सुरू झालेल्या न्यू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये माझे भूगोलाचे प्राध्यापक ,भूतपूर्व प्राचार्य नारायणराव काशीद. दुसरे एक बंधू जामखेड येथील काशीद हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर काशीद . कर्नल साहेब सुद्धा एल. एल. बी. झाल्यानंतर वकिली सुरु केलेली असताना लष्करी सेवेत सेकंड लेफ्टनंट म्हणून रुजू झाले आणि कालांतराने कॅप्टन, मेजर, लेफ्ट.कर्नल आणि कर्नल होऊन सेवानिवृत्त झाले. दरम्यानच्या काळात नियमाप्रमाणे वकिलीची सनद तहकूब ठेवून आर्मी जॉईन केली. कर्नल साहेब हे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या भूतपूर्व चेअरमन कै. साहेबराव पाटील यांचे जावई. कर्नल साहेबांनी नगर जिल्हा न्यायालयात परत वकिली सुरू केल्यानंतर आमच्या जुन्या जिल्हा न्यायालयातील ,लायब्ररी मध्ये नुसते समवयस्क नाही तर तरुण वकिलांच्या सहवासात बस्तान बसवलं. अतिशय सरळमार्गी मितभाषी आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व. प्रत्येकास सहकार्य करण्यास उत्सुक. त्यांच्या वयाचा, पूर्वी लष्करी सेवेत असताना असलेल्या मानमरातबाचा, त्यांनीही कधीही गर्व केला नाही. अतिशय समंजस व्यक्तिमत्व. केंद्र सरकारचा अहमदनगर जिल्ह्याचा सरकारी वकील म्हणून २००३ मध्ये माझी नेमणूक झाली आणि अहमदनगरच्या कार्यरत असलेल्या लष्कराच्या आर्मर्ड कोअर सेंटर किंवा एम. आय . आर .सी असो किंवा व्ही. आर. डी. ई. किंवा सी. क्यु. ए. व्ही. कोणत्याही नगर कोर्टात आलेल्या लष्करातील , लष्करी गणवेशातील माणसाचा माझ्याशी त्वरित संपर्क करून देत आणि त्यांचा आणि माझा सुसंवाद करून देण्याचे मोलाचे काम ते करीत असत. काही वर्षांपूर्वी, एका कोर्ट मार्शलच्या केस मध्ये माझी, पहिल्यांदा प्रोसिक्युटींग कौन्सिल म्हणून नेमणूक झाली. नगरच्या दिवाणी आणि फौजदारी कोर्टातील माझ्या वकिलीच्या अनुभवाशिवाय वेगळ्या फोरम पुढे काम करायचे असल्याने, मला आठवण झाली कर्नल साहेबांची. त्यांच्या जामखेड रोड वरील फार्म हाऊस कम बंगल्यावर त्यांची भेट घेतली आणि त्यांचेकडून प्रोसिजर समजावून घेतले. त्यांनीही अनेक बारकाव्यासह सविस्तर चर्चा करून पहिल्या तारखेला समक्ष हजर राहून माझा उत्साह द्विगुणित केला. त्यांच्या गोरखा रेजिमेंटचा त्यांना अतिशय अभिमान आणि योगायोगाने कोर्ट मार्शल मध्ये सहभागी असलेले बरेच अधिकारी त्या रेजिमेंट मधले असल्याने एक वेगळाच माहोल तयार करून दिला. असे कर्नल अँड. के .ए. काशीद स्वर्गवासी झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. त्यांचे परिवाराचे दुःखात शहर बार च्या वतीने सहभागी होऊन त्यांना आदरांजली अर्पण करतो. अँड.सुभाष विठ्ठलराव भोर ता.१९ /०८/२०२१अहमदनगर.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
उन्हाळ्यातील आहार:रात्री 10 नंतर खाल्ल्यास 20% वाढू शकते शुगर, झोपण्याच्या 3 तास आधी करा...
सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता खाल्लेल्या सारख्याच अन्नाचे शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर होतात वेगवेगळे परिणाम होतात.
‘नाही पुरुष ना महिला’: प्रतिक्रियेनंतर, टीएमसीच्या कीर्ती आझाद यांनी पंतप्रधान मोदींच्या आदिवासी पोशाखाची खिल्ली...
माजी क्रिकेटपटू आणि टीएमसी नेते कीर्ती आझाद यांना मेघालयातील एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदिवासी...
जुगार खेळताना माजी आमदारासह २९ जणांना पोलिसांकडून अटक
जुगार खेळताना माजी आमदारासह २९ जणांना पोलिसांकडून अटकसदरची कारवाई पोलीस अधिक्षकसो मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय...