श्रीगोंदा |
तालुक्यातील भावडी ग्रामपंचायती मध्ये दोन गटांमध्ये बर्याच दिवसांपासून सुरु असलेल्या वादातून गुरुवारी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अॅट्रोसिटीचे गुन्हे श्रीगोदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भावडीच्या सरपंच धनश्री अर्जुन करनोर यांना गावात पाण्याची सोय नाही. हापश्याहुन पाणी न्यावे लागले, असे म्हणाल्याचा राग आल्याने धनश्री कारानोर यांनी फिर्यादीस या मांगटयांनासाठी कितीही काम केले, तरी कमीच आहे, असे म्हणत धक्का बुक्की करत सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद मुक्ताबाई नामदेव शिंदे यांनी दिली आहे. या संदर्भात अर्जुन भागचंद करनोर, देविदास अप्पा कोरडकर, धनश्री अर्जुन करनोर, शहाजी दादासाहेब भोस, आत्माराम बन्सीलाल भोस, कल्याण कांतीलाल भोस, विठ्ठल रंगनाथ भोस, कविता शहाजी भोस (सर्व रा.भावडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे.
तर तसेच भावडी ग्रामपंचायत कार्यालायासामोरील सार्वजनिक ठिकाणी सरपंच धनश्री अर्जुन करनोर तुम्ही आमचे विरुध्द श्रीगोंदा पोलिस स्टेशन येथे केस का दिली होती, असे म्हणुन शिवीगाळ करत असताना फिर्यादी वाद सोडविण्यासाठी गेल्या असता जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उपसरपंच कमलाबाई भगवान छत्तीसे यांनी तक्रार दिली आहे. शहाजी रामचंद्र कोरडकर, अनिल शंकर कोरडकर, ज्योती शहाजी कोरडकर, राणी अनिल कोरडकर, पुनम बाबासाहेब चोरमले, राहीबाई अनिल कोरडकर, अनिता प्रविण शिंगाडे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहे. अॅट्रॉसिटीचा गैरवापर
या सर्व प्रकरणाची निपक्षपणे चौकशी होणे आवश्यक आहे. अनेकजण स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी जर कोणी अॅट्रॉसिटीचा गैरवापर करत स्वतःची राजकीय पोळी भाजत असेल तर हा गुन्हा दाखल करणारे व गुन्हा दाखल करावयास भाग पडणार्या व्यक्तींवरही योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे.