भारत सरकारचे केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक मंत्रालय अंतर्गत मंजूर
रूपये १००० कोटी किंमतीचा व ४०.किमी लांबीचा बायपास रस्ता दिपप्रज्वलन करुन अहमदनगर बाह्यवळण रस्ता-भुमिपुजन समारंभपार पडला
नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
नगर- सोलापूर रस्त्यावरील वाळुंज या ठिकाणी राम सत्य लाॅन या ठिकाणी दक्षिण खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते अहमदनगर बाह्यवळण रस्ता भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
या रस्त्या साठी केंद्र सरकारने एक हजार कोटी रुपये निधी वर्ग केला आहे, चांदबीबी महाल ते वाळुंज गावचे पर्यंत हा बायपास रस्ता होत आहे.४०० क़ोटी चांदबीबी महाल पर्यंत.
मोदी सरकारच्या काळांमध्ये भुसंपादन प्रक्रिया व जलद गतीने होत आहे.या जमिनी मोबदला बाजार भाव प्रमाणे जमिनीचा म़ोबदला दिला जात आहे. या बाह्यवळण रस्ता येणारे महामार्ग वर उड्डाणपुलाचे काम होणार आहे. या बाह्यवळण रस्ता मुळे नगर शहाराचा वाहतूक समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
या वेळी दक्षिणचे लोकसभा खासदार डॉ सुजय विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे मनोगत व्यक्त केले.तसेच नगर श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते, नगर शहरांचे विद्यमान आमदार संग्राम भैय्या जगताप, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिंगे, उपसभापती संतोष म्हस्के, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दादा दरेकर, नाना भांबरे, संरपच मच्छिंद्र थोरात, मांडवे संरपच सुभाष निमसे, चिंचोडी पाटील संरपच मनोज कोकाटे,वाळुंज सुखदेव दरेकर, मठपिंप्रि संरपच हाऊसराजे नवसुपे,दरेवाडी संरपच अनिल करांडे, तहसीलदार उमेश पाटील, उपविभागीय अधिकारी अर्जुन श्रीनावस, मंडळ अधिकारी वेशाली साळवे, तलाठी महादेव शेलार, उपसंरपच अनिल मोरे, भाऊसाहेब शेळमकर,रेवणनाथ चोभे, दिलीपराव भालसिंग, सुरेश सुंबे, भाऊसाहेब बोठे आदी उपस्थित होते.





