
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता रद्द झाला आहे.
आज, 20 जुलैला बर्मिंघममध्ये हा सामना होणार होता, पण भारतीय संघातील 5 प्रमुख खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियाची अंतिम अकरा खेळाडूंची टीमच तयार होऊ शकत नाहीये.
मॅच खेळायला या खेळाडूंचा नकार :
◼️ जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. त्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली. त्याचा परिणाम थेट या स्पर्धेवर झाला.
◼️ सोशल मीडियावर भारतीय खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका झाली, आणि त्यांच्यावर सामना न खेळण्याचा दबावही वाढला.
◼️ याच पार्श्वभूमीवर हरभजन सिंह, इरफान पठान, युसूफ पठान, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे 15 जणांच्या भारतीय संघात आता फक्त 10 खेळाडू उरलेत. अकरा खेळाडूंची टीमच उभी राहू शकत नसल्यामुळे सामना रद्द करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.





