भारतीय संघ बांग्लादेशच्या मोहिमेवर, जाणून घ्या संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक

    261

    ? टीम इंडिया न्यूझीलंडनंतर आता तीनच दिवसांत बांग्लादेशच्या मोहिमेवर निघणार आहे. भारतीय खेळाडू आजच रवाना होणार असून, न्यूझीलंडवरून काही खेळाडू थेट ढाका येथे पोहोचतील. या दौऱ्यात तीन वन डे सामन्यांची मालिका व दोन कसोटी सामने होणार आहेत.

    भारतीय संघासाठी वन-डे मालिकेपेक्षा टेस्ट सिरीज महत्वाची असणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी भारताला या दोन्ही कसोटी जिंकाव्या लागणार आहेत.

    मालिकेचे वेळापत्रक
    ▪️ पहिली वन डे – 4 डिसेंबर – ढाका
    ▪️ दुसरी वन डे – 7 डिसेंबर- ढाका
    ▪️ तिसरी वन डे – 10 डिसेंबर – चत्ताेग्राम

    टेस्ट मालिका
    ▪️ पहिली कसोटी – 14 ते 18 डिसेंबर, चत्ताेग्राम
    ▪️ दुसरी कसोटी – 22 ते  26 डिसेंबर, ढाका

    ‍? भारताचा वन डे संघ
    रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर, कुलदीप सेन.

    ▪️ वन डे सामने – सकाळी 11.30 वाजेपासून
    ▪️ कसोटी सामने – सकाळी 9 वाजेपासून
    ▪️ कुठे पाहाल – सोनी स्पोर्ट्सवर

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here