
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळं भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या कैक वस्तूंपैकी प्रामुख्यानं स्मार्टफोन, हिरे, दागिने, वाहनांचे स्पेअर पार्ट अशा वस्तूंच्या दरांमध्ये वाढ होऊन त्याचा थेट परिणाम आर्थिक गणितांमध्ये होणार असल्याचं स्पष्ट होतं.
इथं जागतिक स्तरावर या मुद्द्द्यावरून भारत आणि अमेरिकेच्या व्यवहारांमध्ये मीठाचा खडा पडल्याचं चित्र असतानाच आता एकाएकी ट्रम्प सरकारनं याच निर्णयाच्या बाबतीत नमकं घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची आयातशुल्कासंदर्भातील भूमिका ठाम असली तरीही सध्या मात्र त्यांनी या निर्णयाला तूर्त 7 दिवसांची स्थगिती दिल्यानं ते एक पाऊल मारेह आल्याचं म्हटलं जात आहे. नव्या माहितीनुसार आता आयात शुल्कासंदर्भातील नियम व अटी 7 ऑगस्टपासून लागू होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, याव्यतिरिक्त अमेरिकी सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाला त्यांच्या यंत्रणेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी हा वेळ देणं अपेक्षित असल्या कारणानं निर्णयाला सध्या स्थगिती देण्यात आली आहे.


