भारतात होणारा वनडे वर्ल्डकप हा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. यंदा वर्ल्डकप भारतात होत असल्याने भारतीय संघाला होम कंडिशनमध्ये खेळण्याचा फायदा होईल. त्यामुळे त्यांच्याकडून विजेतेपदाची अपेक्षा केली जात आहे. मात्र भारतात वर्ल्डकप होण्याने फक्त भारतीय संघालाच नाही तर संपूर्ण भारतालाच फायदा होणार आहे. हा फायदा आर्थिक आहे. Zआयसीसीने वर्ल्डकपच्या कालावधीत आयोजन करणाऱ्या देशांना किती कोटींचा फायदा झाला आहे याची यादी जाहीर केली. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार 2015 च्या वर्ल्डकपचे संयुक्तरित्या आयोजन करणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला 2887 कोटींचा फायदा झाला होता. तर 2019 मध्ये इंग्लंडला 3727 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मात्र भारताला चार वर्षानंतर येणाऱ्या वर्ल्डकपदरम्यान 13,318 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.