मागील २४ तासांमध्ये देशात ८६ हजार ८२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
भारतात कोरोनाबाधितांची संख्या ६३ लाखांच्या पुढे पोहोचली आहे.
गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ८२१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
देशात १ हजार १८१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख १२ हजार ५८५ वर पोहोचली आहे.
देशात सध्या ९ लाख ४० हजार ७०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे आतापर्यंत ९८ हजार ६७८ रुग्णांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत ५२ लाख ७३ हजार २०२ कोरोना बधितानी कोरोनावर मात केली आहे.