- जगातील मोबाईल सेवा क्षेत्र, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्या व सॅटेलाईट क्षेत्राचा अतिशय झपाट्याने विकास होत असून या क्षेत्रातील देशातंर्गत तसेच विदेशी कंपन्या आगामी काळात एकत्रितपणे येऊन काम करणार आहेत. इंडियन स्पेस असोसिएशनच्या संस्थापक सदस्य असलेल्या कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचाही समावेश आहे. एअरटेल कंपनी काय करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे.
- *उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवणार?*
- जगातील नावाजलेले उद्योजक एलन मस्क यांच्या स्टारलिंकनंतर भारतातील एअरटेल ही कंपनीसुद्धा उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवणार आहे. भारती एअरटेल उद्योग समूहाची उपकंपनी असलेली वनवेब कंपनीने 36 उपग्रह नुकतेच प्रक्षेपित केले आहेत.
- लो ऑर्बिट अर्थ सॅटेलाईट प्रकारातील एकूण 648 उपग्रह वनवेब प्रक्षेपित करणार असून या माध्यमातून जगभर इंटरनेटची सेवा दिली जाणार आहे. वनवेब ही ब्रिटिश कंपनी असून त्याला एअरटेलचे पाठबळ मिळालेले आहे. 2022 च्या मध्यापासून सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवण्याचा कंपनीचा विचार आहे.
- वनवेबचे 2022 च्या अखेरपर्यंत जगात इंटरनेट सेवा पुरवण्याचे नियोजन आहे. उपग्रहामुळे इंटरनेट सेवा वेगात देता येणार असल्याने खेडोपाडी भागातही ते पोहोचेल. यासोबतच इंटरनेटचा वेग आणि अखंडित सेवा यांसारखी वैशिष्ट्येही असणार आहे. सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट कंपन्या, जहाज कंपन्या, विमान कंपन्या अशा कंपन्यासाठी ही सेवा फारच फायद्याची ठरणार आहे.
- माहीतीनुसार, वनवेबचे सीईओ सुनील मित्तल यांनी सांगितलं की, “हे 36 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केल्यावर नियोजित असलेले इतर 648 उपग्रहांतील 60 टक्के उपग्रह प्रक्षेपित असतील. कंपनीच्या स्थापनेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे. इतक्या कमी अवधीत आम्ही खूप यशस्वी झालेलो आहे. इतर देशातील दूरसंचार कंपन्या वेगाने आकाशात सॅटेलाईट पाठवत आहेत. त्यामुळे भारतानेही या क्षेत्रात पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जगात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि अतिशय वेगवान इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”, असंही ते म्हणाले.