भारताच्या कोरोना लशीची ताकद वाढणार; COVAXIN मध्ये मिसळणार विशेष घटक.

1035

भारताच्या कोरोना लशीची ताकद वाढणार; COVAXIN मध्ये मिसळणार विशेष घटक.

भारत बायोटेक कोवॅक्सिन या कोरोना लशीमध्ये (corona vaccine) असा घटक मिसळणार आहे, ज्यामुळे या लशीची क्षमता वाढणार आहे.

नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : जगभरात कोरोना लशींचं ट्रायल होतं आहे. मात्र या लशी यशस्वी झाल्यानंतर त्या किती वेळ कोरोनापासून संरक्षण देतील हा प्रश्न उपस्थित होतोच. यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. मेड इन इंडिया कोरोना लस अधिक मजबूत केली जाणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीत एक असा घटक मिसळला जाणार आहे. ज्यामुळे ही लस अधिक काळापर्यंत कोरोनापासून सुरक्षा देईल.

भारतात सध्या तीन औषध कंपन्या कोरोना लशींचं क्लिनिकल ट्रायल करत आहेत. त्यामध्ये भारत बायोटेकची कोवॅक्सिन सर्वाधिक चर्चेत आहे. भारत बायोटेक कोवॅक्सिनमध्ये adjuvant Alhydroxiquim-II हा घटक मिसळणार आहे. या घटकामुळे लशीची क्षमता अधिकच वाढेल. ही लस घेतल्यानंतर शरीरात ज्या अँटिबॉडीज तयार होणार त्या अधिक काळपर्यंत कोरोनापासून संरक्षण देतील. याबाबत ViroVax LLC सह करार झाल्याचं भारत बायोटेकनं सांगितलं आहे.

भारत बायटेकचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर कृष्णा इल्ला म्हणाले, “अँटिबॉडीज प्रतिक्रिया वाढवण्यासाठी adjuvant हा घटक लशीमध्ये असणं खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त काळ रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणारी प्रभावी अशी लस देण्यासाठी भारत बायोटेक आणि ViroVax ने करार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here