भारताचा जावई ठरला पाक टीमसाठी व्हिलन.

633

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानविरुद्ध विजय टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलच्या (T20 World Cup) थरारक लढतीत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडविला… सुपर-12 च्या पाचही मॅच जिंकलेल्या पाकिस्तानचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले… विजेतेपदासाठी येत्या रविवारी (ता.१४) ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडमध्ये सामना होणार आहे.भारताचा जावई ठरला व्हिलनपाकिस्तानच्या पराभवात व्हिलन ठरला तो भारताचा जावई, म्हणजेच हसन अली. 19 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलला हसन अलीने मॅथ्यू वेडचा कॅच सोडला. नि त्यानंतर मॅथ्यू वेडने आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत मॅच जिंकवून दिली. हसन अली बॉलिंगमध्येही अपयशी ठरला. त्याने आपल्या 4 ओव्हरमध्ये तब्बल 44 रन दिल्या. हसन अलीची पत्नी शामिया आरजू भारतीय आहे. 2019 साली हसन आणि शामिया यांचे दुबईत लग्न झालं. शामिया हरियाणाची आहे. हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातल्या चंदेनी गावची आहे. अमिरात एयरलाईन्समध्ये शामिया फ्लाईट इंजिनियर आहे. तिचं कुटुंब दिल्लीत राहतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here