भानामती’च्या संशयावरून दलित महिला, वृद्धांना भरचौकात मारहाण करणारे १२ जण अटकेत

‘चंद्रपूर येथील जिवती तालुक्यातील १२ किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या वणी खुर्द या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली.

या घटनेत ७ जण जखमी झाले असून पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.  अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी घडली. जिवती पोलिसांनी १२ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. सापळा रचून १२ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सुग्रीव शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, दादाराव कोटंबे, बालाजी कांबळे, अमोल शिंदे, गोविंद येरेकर, केशव कांबळे आणि सुरज कांबळे अशी या आरोपींची नावे आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here