भाजप नेत्याचा निवडणुक आयोगावर गंभीर आरोप; थेट निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी

    14

    महापालिका निवडणुकीआधीच मतदार याद्यांवरून राजकारण रंगलं आहे. राजकीय नेत्यांकडून थेट निवडणूक आयोगालाच घेरलं जात आहे. विविध राजकीय पक्षांकडून मतदार यादीतील घोळ समोर आणले जात आहेत. राजकीय नेते मतदार याद्यांमधील दुबार मतदार यादीतील घोळाचा थेट आयोगाच्या अधिकाऱ्यांना जबाब विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मतदार यादीतील घोळावरून निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.

    मुंबईसह कल्याण-डोंबिवलीतील मतदार याद्यांमधील घोळ समोर येत आहे. यावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आयोगाला जाब विचारला. मतदार याद्यामधील घोळ दुरुस्त करा अन्यथा निवडणुका पूढे ढकला, अशी मागणी भाजपचे नरेंद्र पवार यांनी केली. यावेळी त्यांनी दुबार मतदार विशिष्ट समाजाचे आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केली.

    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या तरी मतदार याद्यांचा घोळ मात्र काय आहे. मतदार याद्यांमध्ये मतदारांची अदलाबदल, दुबार मतदार मोठ्या प्रमाणात आढळल्याने भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत मतदार याद्यांमधील घोळ उघड केला.

    अनेक प्रभागांमधील दुबार मतदान उघड करत काही प्रभागात 1000, 3400 मतदार दुबार असल्याचे सांगत विशेष करून विशिष्ट समाजाचे मतदार दुबार असल्याचा आरोप केला. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे. मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त क्रा. त्यासाठी मुदतवाढ द्या अन्यथा निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here