नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.नवाब मलिक यांनी राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्याची सविस्तर माहिती पत्रकारपरिषदेत दिली. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जमीन घोटाळा प्रकरणात ११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर, औरंगाबाद, आणि बीडमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. जमीन घोटाळा झालेल्या दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थाने आहेत.आष्टी मुस्लीम देवस्थानाच्या ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकायदेशीरपणे खालसा करून लाटण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू देवस्थानच्या ३०० एकर जमिनीचा समावेश असून मुस्लीम दर्गा आणि मशिदीच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. देवस्थानांच्या जमिनीचा मालकी कधीही बदलता येत नाही. पण एकूण ५१३ एकर जमिनीचा हा घोटाळा झालाय, असा दावा नवाब मलिक यांनी केला.भाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली; नवाब मलिक यायावेळी नवाब मलिक यांनी आष्टीतील देवस्थान जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धस यांच्यावर आरोप केले. या घोटाळ्यात मच्छिंद्र मल्टीस्टेट सोसायटीचा समावेश आहे. या सोसायटीच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. सोसायटीत असणाऱ्या सदस्यांच्या खात्यात पैसे गेले. यामधून खरेदी खत करण्यात आले. याप्रकरणी राम खाडे यांनी ‘ईडी’कडे केलेल्या तक्रारीत सुरेश धस आणि भीमराव दोंदे यांचे नाव असल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.भाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोपदरम्यान नवाब मलिक यांच्या या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. माझी संपत्ती चार कोटीची आहे. मलिक यांनी माझी संपत्ती घ्यावी. मला पाच पन्नास द्यावेत म्हणजे माझे कर्ज तरी फिटेल असं सांगतानाच मलिक यांच्यावर मला आता अब्रुनुकसानीचा दावा करावा लागेल, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
भिंगार ,खळेवाडी भागात दुषित पाणी पुरवठा. नागरिकांचे आरोग्य धोक्यात:
भिंगार मधील खळेवाडी भागात नळाला दूषित पाणी येत आहे,हे पाणी पिण्या योग्य नाही.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील लघु उद्योजकांचा होणार गौरव, 15 डिसेंबरपर्यंत मागवले अर्ज, जाणून घ्या काय आहेत...
2021 च्या पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योग हा 01 जानेवारी 2018 ला किंवा त्यापूर्वी उद्योग आधार म्हणून नोंदणी झालेला असावा. तसेच सगल...
2023 च्या अर्थसंकल्पातून पाच मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत 2023-24 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. जगण्याच्या वाढत्या किंमती...
“मोअर दॅन व्हिंडिकेशन”: सर्वोच्च न्यायालयाच्या हिंडेनबर्ग आदेशावर हरीश साळवे
नवी दिल्ली: अदानी समूहाविरुद्धच्या हिंडेनबर्ग आरोपांमध्ये सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया किंवा सेबीला पाठिंबा देणारा सर्वोच्च...





