*भाजपाला दिवाळी ‘कडू’! पोटनिवडणुकांत विरोधकांची सरशी*लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांतून पुन्हा अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा करिश्मा कायम आहे आणि जिथे ते नाहीत, तिथेच भाजप व काँग्रेस यांच्यात सामना झाला आणि काही प्रमाणात काँग्रेसला यश मिळू शकले, असे स्पष्ट झाले.*पश्चिम बंगालमध्ये चारही जागांवर तृणमूलने मुसंडी मारताना भाजपकडून दोन जागा जिंकल्या, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने दोन्ही जागांवर लालुप्रसाद यांच्या पक्षाला पराभूत केले. मेघालयाच्या तिन्ही जागा एनपीपीच्या पारड्यात गेल्या. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचा उमेदवार जिंकला.*मध्य प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यांत मात्र काँग्रेस व भाजप थेट सामने झाले. त्यापैकी राजस्थानातील दोन, हिमाचल प्रदेशातील तीन व मध्य प्रदेशातील एक अशा सहा जागा काँग्रेसने जिंकल्या वा स्वत:कडे ठेवल्या. कर्नाटकातील एक जागाही काॅंग्रेसने मिळवली. भाजपने मध्य प्रदेशातील तीन व आसामच्या पाचही जागा जिंकल्या. मेघालयच्या तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्षाने विजय मिळविला. *हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठाच धक्का बसला मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार व माजी मुख्यमंत्री स्व. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी विजय मिळविला. विधानसभेच्या जागाही काँग्रेसने जिंकल्या. यापैकी भाजपने जुब्बल-काेटखाई जागा गमावली.*राजस्थानमध्ये काँग्रेसराजस्थानचमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने सहजच जिंकल्या. त्या दोन्ही जागा याआधीही काँग्रेसकडेच होत्या. त्या मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.*मध्य प्रदेशात भाजपचे नुकसानमध्य प्रदेशमध्ये भाजपने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर एक जागा काँग्रेसने मिळवली. खंडवा लोकसभेची जागाही भाजपने राखली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांनी ८५ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला.*कर्नाटकमध्येही पिछेहाटकर्नाटकमध्ये भाजपला आपल्याकडील दोनपैकी एका जागेवर विजय मिळवता आला. सिंदगी येथे भाजपचे रमेश भुसानूर यांनी विजय मिळविला, तर हंगलमधून भाजपचा पराभव करून काँग्रैसचे श्रीनिवास माने विजयी झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
कुनो नॅशनल पार्कमधील दोन चित्त्यांच्या मृत्यूसाठी वन्यजीव पशुवैद्यक गळ्यात गळ घालत आहेत.
कुनो नॅशनल पार्कमध्ये या आठवड्यात झालेल्या दोन चित्त्यांच्या मृत्यूने काही वन्यजीव पशुवैद्यकांच्या मते हे एक अनपेक्षित आव्हान...
India China : गलवान खोऱ्यामध्ये चिनी झेंडा फडकवल्याचा दावा
China host flag in Galwan Valley : आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनची आगळीक सुरू आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी भारत-चीन सैन्यादरम्यान संघर्ष झालेल्या...
Accident : संगमनेर शहरात भीषण अपघातात महिला ठार
Accident : संगमनेर : शहरात आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ मोपेडवरून रस्ता (Road) ओलांडताना महिलेच्या दुचाकीला मालट्रकची...
Maratha Reservation : कुणबी नाेंदी शाेधण्यासाठी जिल्ह्यात विशेष माेहीम सुरू; १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांची हाेणार...
नगर : आजपासून जिल्ह्यात मराठा कुणबी व कुणबी मराठा, कुणबी (Maratha Reservation) जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली...




