भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची निवड होण्याची शक्यता खास सूत्रांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात तब्बल चौदा खातं यशस्वी सांभाळून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली होती. भाजपच्या सरकारच्या काळात सर्वात जास्त खाते मिळालेले ते एकमेव मंत्री होते. महाराष्ट्र शासनाच्या स्थापनेपासून राजशिष्टाचार खाते मुख्यमंत्री वगळता पहिल्यांदा राम शिंदे यांना देण्यात आले होते. नव्याने निर्माण झालेले ओबीसी खाते ही पहिल्यांदा प्रा राम शिंदे यांना देण्यात आले होते. तसेंच प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासोबत त्यांनी संघटनेतही अनेक पदांवर काम पाहिले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या स्पर्धेत बलाढ्य नाव म्हणून माजी मंत्री राम शिंदे यांचे नाव घेतले जात आहे.महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत … मुबई, ठाणे, नाशिक या महानगर पालिकांच्या निवडणुका येत्या काळात होऊ घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे जि . प .. व पं .स . यांच्या ही निवडणुका बहुतांशी ठिकाणी सहा महिन्याच्या कालावधीत येऊ घातलेल्या आहेत . त्या दृष्टीने भाजपमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा होत आहे …
महाराष्ट्रातील नेते आशीष शेलार, चंद्रकांत बावनकुळे, राम शिंदे, सौ .पंकजाताई, विनोद तावडे, स्वतः .चद्रकांत दादा पाटील, हे दिल्लीत दाखल झालेले आहेत .
महाराष्ट्रातील भाजपा चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे सर्वात मितभाषी, शांत, संयमी अध्यक्ष आहेत त्यांचे वय पाहता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेतृत्वबदलाची चर्चा होणे स्वाभाविक आहे .
आशिष शेलार या स्पर्धेत असले तरी शहरी चेहरा म्हणून ते या स्पर्धेतून बाद होतात . ग्रामीण भागात देवेन्द्र जी नी पायाभूत सुविधा आणि शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजना या पार्श्वभूमीवर ग्रामीण प्रदेशाध्यक्ष असणे अतिशय गरजेचे आहे .
चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत एकतर ओबीसी चेहरा आणि मंत्री पदाचा अनुभव हे यांच्या जमेच्या बाजू आहेत . विदर्भात देवेन्द्र फडणवीसां सारखे सक्षम नेतृत्व असताना पुन्हा त्याच ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पद देणे हा प्रादेशिक असमतोल होईल म्हणून राम शिंदे हेच प्रदेशाध्यक्ष पदाचे एकमेव उमेदवार ठरतात .
प्रा राम शिंदे हे अभ्यासू आणि अनुभवी चेहरा म्हणून ज्ञात आहेत शिवाय त्यांच्या समाजाचे पाठबळ आहे असे असतानाही ते सर्व समाजात सर्वसमावेशक भूमिका घेतात त्यामुळे विशिष्ट समाजाचा शिक्का त्यांच्यावर लागू होत नाही आणि हीच त्यांच्या साठी मोठी जमेची बाजू आहे . . .
शिवाय प्रादेशिक विचार करता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र यांना सर्वांना सांधणारे भौगोलिक स्थान म्हणजे जिल्हा अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी चे बालेकिल्ला आणि त्यांच्या कर्जत-जामखेड मतदार संघापासून जवळच बारामतीआहे. त्या पक्षाच्या बलस्थानाला हादरे देण्याइतपत त्यांचा समाज या बालेकिल्ल्यांमध्ये पसरलेला आहे आणि आज त्यांच्या आरक्षणाच्या लढ्याचे सर्वमान्य नेतृत्व . प्रा. . राम शिंदे हे करत आहेत ..
बाकी इतर नावांबाबत विचार करता पक्षीय गटबाजीला प्रोत्साहन मिळू शकते… चुकीची आक्रमकता ही समोरच्याच्या समाजात विनाकारण द्वेष उत्पन्न करते जेणेकरून ज्याच्यावर तुम्ही आक्रमक होता त्यांचाच फायदा होईल … त्यामुळे इतर नावे स्पर्धेतून आपोआपच बाद होतात . म्हणूनच
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदी सर्वमान्य चेहरा म्हणून . प्रा . राम शिंदे यांचीच निवड अपरिहार्य ठरत आहे.
एक अभ्यासु,, शांत, संयमी प्रसंगी आक्रमकता असणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण पार्श्वभूमी, कोणताही राजकीय वारसा नसताना समर्थपणे मंत्रीपदाची जबाबदारी निभावणारे नेतृत्व म्हणून श्री राम शिंदे हेच मुख्य पर्याय होत आहे असे जाणकारांचे मत आहे.






