मुंबई दि. २१ ऑक्टोबर – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत दिली. आज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजप पक्षाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांचे राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत असेही जयंत पाटील म्हणाले. गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केले. आता फक्त त्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांचे समर्थक येण्यास इच्छूक आहेत त्यांनाही काही दिवसात प्रवेश दिला जाईल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
Radhakrishna Vikhe Patil : महाविद्यालयात सेतू सुविधा केंद्र सुरू करणार : राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर: आजचा युवक उपक्रमशील आहे. माहिती-तंत्रज्ञानाच्या (Information Technology) बदलत्या गोष्टी तो जलदपणे आत्मसात करतो. युवकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी यापुढे प्रत्येक...
1933 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 39 बाधितांचा मृत्यू
सातारा दि. 25 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1933 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले...
खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला आग लावली, अमेरिकेचा ‘तीव्र निषेध’ – पहा
नवी दिल्ली: युनायटेड स्टेट्सने सोमवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासात तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या प्रयत्नाचा निषेध केला...
केरळमध्ये मुसळधार पावसाने कहर केला; इडुक्कीमध्ये रेड अलर्ट
Kalarkutty dam shutters raised on Wednesday, July 5. Photo: Manorama
तिरुअनंतपुरम: केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने पलक्कडच्या वडक्कनचेरी,...




