भाऊबीजेच्या दिवशी तरुणाची निर्घृण हत्या; मनमाड रेल्वे स्थानकावर हत्याकांड

738

मनमाड : चार ते पाच जणांच्या टोळीने एका तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर वर Manmad Railway Station ही घटना भयानक घटना घडली आहे. रेल्वे स्थानकातील Railway Station प्रवाशांसमोर हा हत्याकांड झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. इंस्टाग्रामवरील अकाऊंट डिलीट करण्याच्या वादातून २१ वर्षीय तरुणांची चाकूने भोसकून ४ ते ५ तरुणांनी निर्घृण हत्या केली आहे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या युवकाचे नाव शिवम पवार असे आहे, तर त्याला तीन बहिणी देखील आहेत. ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशीच असं घडल्याने संपूर्ण कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वृत्तानुसार, रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती. त्यावेळी ४ ते ५ तरुणांनी शिवमवर धारदार शस्त्राने ५ ते ६ वार केले आहेत. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाला. त्यावेळेस त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात Hospital दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू Death झाला होता.

कल्याण येथे राहणाऱ्या एका मुलीसोबत शिवमचे प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधातून त्याने इंस्टाग्राम अकाउंट खोलले होते. तर हे अकाउंट बंद करण्यावरून त्या दोघांमध्ये भांडण सुरू होते. त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी तरुणीचे त्याला रेल्वे स्थानकावर भेटण्याचे ठरवले होते. मात्र ही तरुणी एकटी आली नाही. तिच्या सोबत चार ते पाच तरुण आले. रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ३ व ४ मधील गार्डन जवळ मुलीसोबत आलेल्या या ४ ते ५ तरुणांनी शुभमला बेदम मारहाण केली. त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात त्याचा मृत्यू झाला. सर्व मारेकरी हल्ला केल्यानंतर नंदीग्राम एक्स्प्रेसने Nandigram Express मुंबईकडे Mumbai फरार झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here