भविष्यात बुरुडगाव कचरा डेपोचा भाग हा वनराई म्हणून ओळखला जाईल. मनपाच्या बुरूडगाव कचरा डेपो येथे वृक्षरोपण करण्यात आले. सुमारे दहा ते पंधरा फुटाचे वृक्ष या ठिकाणी लावण्यात येत आहेत. कचरा डेपो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लावण्यात येणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले
उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक विनित पाऊलबुधे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, उद्यान प्रमुख मेहेर लहारे, राधाकृष्ण कुलट, ओकार देशमुख, शहर अभियंता सुरेश इथापे, इंजिनीयर श्रीकांत निंबाळकर आदी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, अहमदनगर महानगरपालिकेचे बूरुडगाव येथील कचरा डेपो आहे. संपूर्ण शहराचा कचरा संकलन या ठिकाणी होत आहे. व त्यावर ती प्रक्रिया केली जाते. हा भाग स्वच्छ सुंदर हरित राहण्यासाठी येथे वृक्षांची अत्यंत गरज आहे या दृष्टिकोनातून महापालिकेने पावले उचलली असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल.