खोपोली:
?️ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज पहाटे खोपोलीजवळ बोरघाटात आज (15 फेब्रवारी) भीषण अपघात झालाय.
या भीषण अपघातात एकापेक्षा अधिक वाहनांची एकमेकांना टक्कर होऊन जवळपास 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
*सविस्तर बातमी वाचा..*
⚡ मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Express Way Accident News) झालेल्या या अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहीती समोर आली आहे.
या अपघातात एक नाही, दोन नाही तर तब्बल 6 वाहनांची एकमेकांना जोरदार धडक होऊन अपघात 4 जण जागीच ठार झाले असून इतर 8 जणांना गंभीर दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहे.
? मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या 6 वाहनांची बोरघाटामध्ये एकमेकांना अचानक टक्कर झाली. जेव्हा अपघात झाला तेव्हा तो आज पहाटे 6.30 वाजेच्या सुमारास झाला असल्याचं समजतंय.
या 8 जणांपैकी तिघांची परिस्थिती गंभीर असल्याचं समजत आहे. अपघातानंतर या जखमींवर नवी मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.?♂️
*मिळालेल्या माहितीनुसार,*
आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मुंबईकडे जात असलेल्या एका ट्रेलरचा ब्रेक फेल होऊन 6 ते 7 वाहने एकमेकांना धडकली. यामध्ये ट्रक व टेम्पोच्या दरम्यान आलेल्या कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
या भीषण अपघातामध्ये या दोन मोठ्या वाहनांच्यामध्ये चिरडल्या गेलेल्या या कारमध्ये असणाऱ्या चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.?
प्राप्त माहीतीनुसार,
‘एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या एका कंटेनरने पुढे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक दिली. स्विफ्ट कार तिच्यापुढे जाणाऱ्या टेम्पोवर जाऊन धडकली.
स्विफ्ट कारनं जोरात दिलेल्या धडकेमुळं टेम्पोने त्याच्यापुढे जात असलेल्या कारला जाऊन धडक दिली.
या कारच्यापुढे आणखी एक कंटेनर जात होता, ही कार त्या कंटेनरवर जाऊन आदळली’, असा अपघात झाल्याचा सांगण्यात येतंय.
सध्या वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.