*ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर.. सोलापूर, नगरला वगळले..!*

? _*ब्रेकिंग : विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर.. सोलापूर, नगरला वगळले..!*_

➖➖➖➖➖➖➖[

?️ महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान, तर 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. खरे तर विधान परिषदेच्या एकूण 8 जागांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. मात्र, सोलापूर आणि अहमदनगर वगळून 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुंबईतील 2, कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलडाणा-वाशिम व नागपूर, अशा 6 जागांसाठी ही निवडणूक होत आहे..

??‍♂️ मुंबईत रामदास कदम व भाई जगताप, कोल्हापुरात सतेज पाटील, धुळ्यात अमरिशभाई पटेल, अकोल्यात गोपीकिशन बजोरिया, तर नागपूरमध्ये गिरिश व्यास यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

? *नगर, सोलापूर का वगळले..?*नगर जिल्ह्यातील 5 पालिका व भिंगार छावणी परिषदेवर सध्या प्रशासक आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 75 टक्के होत नाही. सोलापूरमध्येही अशीच स्थिती असल्याने या दोन्ही मतदार संघातील निवडणूक स्थगित ठेवण्यात आली आहे.

? दरम्यान, सध्या राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता या निवडणुकीत हे सगळे पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे, याबाबत उत्सुकता ताणली आहे. काँग्रेसने यापूर्वी अनेकदा स्वबळाचा नारा दिलाय. शिवसेना व राष्ट्रवादीही आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.

? *निवडणूक कार्यक्रम* ▪️

अधिसूचना जाहीर : 16 नोव्हेंबर

▪️ अर्ज दाखल करण्याचा दिनाक : 23 नोव्हेंबर

▪️ अर्जांची छाननी : 24 नोव्हेंबर ▪️ अर्ज मागे घेण्याची मुदत : 26 नोव्हेंबर

▪️ मतदान : 10 डिसेंबर (सकाळी 8 ते 4)

▪️ मतमोजणी : 14 डिसेंबर

➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here