१)पारनेर नगरपंचायतीच्या चाव्या अपक्ष व आघाडीच्या हातात
पारनेर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा व एक पुरस्क्रुत तर शिवसेनेचे सहा, शहर विकास आघाडीच्या दोन एक भाजप आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले.
या निवडणुकीत शिवसेनेच्या नेत्या माजी सभापती जयश्री विजय औटी, माजी उपनगराध्यक्ष व शहर विकास आघाडीचे प्रमुख चंद्रकांत चेडे यांचा धक्कादायक पराभव झाला.
२)कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा
कर्जत नगरपंचायतीत १७ पैकी राष्ट्रवादी काँग्रेस १२ आणि काँग्रेस ३ अशा एकूण १५ जागांवर विजय भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या.
माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखविला. तर माजी मंत्री राम शिंदे यांना मतदारांनी धक्का दिला.
अकोले – भाजप – 12, राष्ट्रवादी- 2, काँग्रेस- 1, शिवसेना – 2